हरिनाम सप्ताहास प्रारंभ

| खांब-रोहा | वार्ताहर ।

रोहा तालुक्यातील धामणसई येथे आज मंगळवारी (दि.4) हनुमान जन्मोत्सवानिमित्थ हरिनाम सप्ताहास प्रारंभ करण्यात आला आहे. स्वा.सु.गुरूवर्य अलिबागकर महाराज गोपाळबाबा वाजे धोंडू बाबा कोलाटकर यांच्या कृपाशीर्वादाने व ह.भ.प.नारायण महाराज वाजे, सखाराम महाराज निकम(भाऊ), मारूती महाराज कोलाटकर, दगडू महाराज दळवी व बाळाराम महाराज शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत असलेल्या या सप्ताहप्रसंगी आज सकाळी 8 वा. रघुनाथ महाराज भोकटे यांच्या हस्ते ध्वजारोहण व कळशारोहण, 9 वा. गुरूवर्य सखाराम महाराज निकम (भाऊ) यांच्या हस्ते ग्रंथराज ज्ञानेश्‍वरीचे पारायण, तर दैनंदिन कार्यक्रमातंर्गत पहाटे काकड आरती, 9 ते 12 व 3 ते 4 ग्रंंथराज ज्ञानेश्‍वरीचे सामुदायिक पारायण, 4 ते 5 प्रवचन, 5 ते 6:30 सामुदायिक हरिपाठ, 7 ते 9 हरिकिर्तन व तद्नंतर महाप्रसाद व जागर भजन आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. तर या प्रसंगी दि.4 रोजी ह.भ.प.किरण महाराज कुंभार(पाली), दि.5 रोजी ह.भ.प. दगडू महाराज दळवी, तर दि. 6 रोजी ह.भ.प.बाळाराम महाराज शेळके यांचे हनुमान जन्मोत्सव आधारित किर्तनसेवा संपन्न होणार आहे. व दु.3 वा. पालखी मिरवणुकीने या सप्ताहाची सांगता करण्यात येणार आहे.

या सप्ताहाचे यशस्वीतेसाठी भैरवीनाथ ग्रामस्थ व महिला मंडळ तसेच तरूण मंडळाचे सदस्य मोलाचे सहकार्य करीत आहेत.

Exit mobile version