| पुणे | प्रतिनिधी |
आज मंगळवारी, (दि.13) रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इ. 10 वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यंदा राज्याचा दहावीचा निकाल 94.10 टक्के लागला आहे. यंदाही कोकण विभाग अव्वल असून यंदा दहावीच्या निकालात नागपूर विभाग तळाला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालात बाजी मारली असून उत्तीर्ण झालेल्यी मुलींची टक्केवारी 96.14 अशी आहे, तर मुलांची टक्केवारी 92.21 अशी आहे. एकूणच, 15,58,020 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, ज्यापैकी 93.04% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
निकालाची विभागनिहाय टक्केवारी
पुणे : 94.81 टक्के
नागपूर : 90.78 टक्के
संभाजीनगर : 92.82 टक्के
मुंबई : 95.84 टक्के
कोल्हापूर : 96.78 टक्के
अमरावती : 92.95 टक्के
नाशिक : 93.04 टक्के
लातूर : 92.77 टक्के
कोकण : 99.82 टक्के