| नाशिक | प्रतिनिधी |
समृद्धी महामार्गावर वैजापूर तालुक्याच्या हद्दीत मंगळवारी (दि.13) रोजी सकाळी भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून, तिघा चिमुकल्यांसह पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. नाशिकहून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जात असताना वाहनाचा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. या दुर्घटनेत पूनम चव्हाण (30) या महिलेचा मृत्यू झाला आहे. तर अजयकुमार चव्हाण (38), आनंद चव्हाण (35) नॅन्सी चव्हाण (8), अनन्या चव्हाण (5) आणि पियानसी (6) हे पाच जण जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे जखमींमध्ये तीन चिमुकल्यांचा समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी तातडीने वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस पुढील तपास करत आहेत.