गायरान जमिनी अतिक्रमणाबाबत निवेदन

| म्हसळा | प्रतिनिधी |

ग्रामपंचायत देवघर यांनी नियमाकुल आणि अतिक्रमणनिष्कासन कारवाई स्थगित करणेकरिता ठराव घेऊन तो एकमताने मंजुरी घेण्यात आली. त्याबाबतचे निवेदन तहसीलदार समीर घारे, गटविकास अधिकारी बापूसाहेब पोळ यांचे कडे निवेदन देण्यात आले. या प्रसंगी देवघर ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष संतोष पाखड,सरपंच सौजन्या पोटले, उपसरपंच कृष्णा दिवेकर, सदस्या नयना चौकेकर, शिवराम बांद्रे, मनोहर चौकेकर, गणपत मुंडे, सुजित पोटले, गीतेश गिजे आदि मान्यवर उपस्थित होते. हा विषय ग्रामपंचायत अखत्यारीत येत असून ग्रामपंचात स्तरावर मीटिंग घेऊन त्या बाबत योग्य तोडगा काढावा, मात्र यासाठी लागणारे मार्गदर्शन करण्याचे आश्वासन तहसीलदारांनी दिले.

Exit mobile version