। चिपळूण । प्रतिनिधी ।
गेल्या महिनाभरात चिपळूण नगर परिषदेने पुणे येथील पेट्स फोर्स संस्थेच्या माध्यमातून शहरातील 500 भटक्या कुत्र्यांची नसबंदी केली आहे. यासाठी सुमारे 10 लाख रुपये खर्च झाला.
गेल्या काही वर्षापासून शहरात भटक्या कुत्र्यांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. त्यातच मध्यंतरी शहरातील वडनाका व पागझरी परिसरात भटक्या कुत्र्यांनी बालकांवर हल्ले केले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती. यावर उपाय म्हणून नगर परिषदेने 500 कुत्र्यांची नसबंदी व त्यांना रेबीज लस देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गेल्या महिनाभरापासून पुणे येथील पेट्स फोर्स संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी शहरात फिरून कुत्र्यांना पकडून अग्निशमन इमारतीत केलेल्या खास कक्षात नेऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या कुत्र्यांची नसबंदी केली.