रायगडात पायाभूत सुविधांसहआरोग्यालाही बळकटी

| रायगड । प्रतिनिधी ।

एकेकाळी भाताचे कोठार म्हणून ओळखल्या जाणार्‍या रायगड जिल्ह्याला, औद्योगिकीकरण आणि शहरीकरणामुळे नवी ओळख मिळाली आहे. पायाभूत सुविधांचे भक्कम जाळे जिल्ह्यात प्रस्थापित झाले आहे. त्याचबरोबर या जिल्ह्यात आरोग्य सुविधांनाही चालना मिळत असून त्याचा परिणाम प्रामुख्याने माता-बाल आरोग्यस्थितीतून दिसून येत आहे.

रायगड जिल्ह्याचे क्षेत्रफळ 7152 चौ. कि.मी. असून यात 15 तालुके आणि 1 हजार 909 गावांचा समावेश आहे. जिल्ह्याची लोकसंख्या 29 कोटी आहे. औद्योगिकरणामुळे राज्यातील इतर भागांच्या तुलनेत जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वार्षिक 2 लाख 17 हजार 419 पर्यंत वाढले आहे. पुर्वी शेती आणि मासेमारी या दोन घटकांवर पुर्वी रायगड जिल्ह्याचे अर्थकारण अवलंबून होते. पण आता याची जागा उद्योग आणि पर्यटनाने क्षेत्राने घेतली आहे. त्यामुळे उत्पन्नासाठी शेतीवरील अवलंबित्व हळूहळू कमी होऊ लागले आहे. मुंबई आणि ठाणे यासारख्या महानगरांच्या शेजारी असल्याने रायगडचे भौगोलिक महत्त्व अनन्य साधारण आहे. त्यामुळेच मुंबईचा महानगर क्षेत्राचा विस्तार हा रायगड जिल्ह्याच्या दिशेने सुरू झाला आहे. यामुळेच रस्ते, रेल्वे आणि विमानसेवेचे भक्कम जाळे जिल्ह्यात विकसीत होऊ लागले आहे.

दळणवळणांच्या सोयी सुविधांबरोबरच आरोग्य, शिक्षण आणि पाणी पुरवठा या घटकांचा विकासावर यंत्रणांनी लक्ष्य केंद्रीत केले आहे. याचे सकारात्मक परिणाम दिसून येऊ लागले आहेत. जिल्ह्यातील वैद्यकीय सेवांच्या सक्षमिकरणावर गेल्या काही वर्षांत भर दिला गेला आहे. त्यामुळे आरोग्य सुविधा सुधारण्यास मदत झाली आहे. जिल्ह्यात सध्या 14 शासकीय रुग्णालये, 10 शासकीय दवाखाने. 54 प्राथमिक आरोग्य केंद्र, 288 उपकेंद्र आहेत. खाजगी रुग्णालयांची संख्याही गेल्या काही वर्षांत वाढली आहे. त्यामुळे आरोग्याचा स्तर उंचावण्यास मदत झाली आहे. गरोदर महिलांची नियमित तपासणी, त्यांना लोह गोळयंचे वाटप, जिल्ह्यात रुग्णालय बाह्य प्रसुतीचे प्रमाण बरेच कमी झाले आहे. त्यामुळे प्रसुती दरम्यान महिला आणि बालमृत्यूचे घट झाल्याचे दिसून येत आहे.

स्वच्छता आणि पाणी पुरवठा यावर जिल्ह्याची कामगिरी लक्ष्यवेधी ठरली आहे. जनतेला पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी रायगड जिल्हा परिषदेने केलेल्या विविध उपाययोजनाचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत अशुद्ध होण्याचे प्रमाण घटले आहे. गेल्या वर्षभरात एकाही ग्रामपंचायतीला पिण्याच्या पाण्याचे धोकादायक स्त्रोत असल्यामुळे दिले जाणारे लालकार्ड एकाही ग्रामपंचायतीला देण्यात आलेले नाही. त्यामुळे जलजन्य आजारांना आळा बसण्यास मदत झाली आहे. जिल्ह्यात शंभर टक्के गावे ही हागणदारी मुक्त झाली आहेत. त्यामुळे स्वच्छतेचा दर्जा उंचावला आहे.

Exit mobile version