| महाड | प्रतिनिधी |
रयत शिक्षण संस्थेचे, न्यू इंग्लिश स्कूल विन्हेरे, ता. महाड, जि. रायगड या विद्यालयात शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थी शिक्षक दिन साजरा करण्यात आला. इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिकेत जाऊन आजचा दिवस साजरा केला. प्रार्थना व परिपाठ झाल्यानंतर वर्गात जाऊन अध्यापन केले. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने शिकविण्याचे काम विद्यार्थी शिक्षक करत होते. कु. असिफा जोगीलकर ही मुख्याध्यापकांच्या तर पार्थ पालांडे हा पर्यवेक्षकांच्या भूमिकेतून सर्व विद्यार्थी शिक्षकांवर नियंत्रण ठेवत होते. कोठेही गडबड दिसली नाही. काही विद्यार्थी शिक्षकांनी कविता चालीत म्हणून घेतल्या.सुंदर चित्रे काढून घेतली. सुजल पोफळकर याने शारीरिक शिक्षणाच्या तासाला सावधान- विश्राम व दहीने मुड- बाये मुड उत्कृष्ट पणे घेतले.
अध्यापनानंतर सभेचा कार्यक्रम घेण्यात आला. कर्मवीर भाऊराव पाटील व सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .इयत्ता 10वीच्या वर्गाकडून सर्व सेवकांना गुलाबपुष्प व भेटवस्तू देण्यात आली. यावेळी इयत्ता 5वीच्या वर्गाकडूनही सर्व शिक्षकांना प्रेमाची भेट म्हणून मोठी कॅडबरी देण्यात आली. इयत्ता 5वी ते 9वीतील अवधूत , अनिष , विक्रांत, नितीन, ईश्वरी या विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. पर्यवेक्षक पार्थ याने शिक्षकांबद्दल आदर व्यक्त करत , आलेले अनुभव कथन करताना सर्वानी शिक्षकांच्या आज्ञाचे पालन करण्याची ग्वाही दिली. मुख्याध्यापक असिफा हिने एक तास शिकविण्यासाठी किती अभ्यास करावा लागला तर आपणही आपल्या शिक्षकांचे लक्षपूर्वक कुन चांगला अभ्यास केला पाहिजे असे सांगितले. श्री. पेरवी सर , श्री. उजवणे सर, मुख्याध्यापिका सौ. मांडवकर मॅडम यांनी वि ीशद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन श्रावणी सकपाळ व प्रणाली देवघरकर यांनी केले.आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.