। हमरापूर । प्रतिनिधी ।
आज विज्ञान युगाच्या काळात विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी शिक्षण न मिळता प्रॅक्टिकल शिक्षण मिळणे गरजेचे आहे, असे मत रसायनी भागातील कोकियो कॅमलीन कंपनीचे उपाध्यक्ष श्रीराम दांडेकर यांनी काढले आहेत. पेण तालुक्यातील हिराजी पाटील एज्युकेशन सोसायटीच्या खारपाडा येथील माध्यमिक विद्यामंदिरात विज्ञान प्रयोगशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
पुढे बोलताना श्रीराम दांडेकर म्हणाले की, पुस्तकातून फक्त शिक्षण मिळते. मात्र, प्रॅक्टिकल मिळणे गरजेचे आहे. हसत खेळत शिक्षण मिळाले तर फायदा होतो. त्यामुळे शिक्षकांनी शिकवताना मुलांना प्रेमाने शिकवावे. तसेच, विना अनुदानित शाळांना खासकरून प्राथमिक शाळांनाच मदत करतो. आज ही संधी दिली त्याबद्दल ऋणी असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, श्रीराम दांडेकर व त्यांच्या सर्व अधिकार्यांनी या विज्ञान प्रयोगशाळेच्या माध्यमातून शाळेला मोठी मदत केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक सचिव हिराजी पाटील, अध्यक्ष शशिकला पाटील, कंपनीचे जनरल मॅनेजर अनिल खुलेकर, संस्थेचे उपाध्यक्ष लीलाधर पाटील, खजिनदार रमेश तांडेल, देवराम घरत यांच्यासह शिक्षक वर्ग पालक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.