सुनेत्रा पवारांचा खासदारकीचा राजीनामा

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी आपल्या राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेत त्यांनी आपले राजीनामा पत्र सादर केले. त्यामुळे उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान झाल्यापासून त्यांच्या खासदारकीच्या राजीनाम्याची चर्चा होती. मात्र, बारामती विधानसभा निवडणुकीत विक्रमी मतांनी विजयी होऊन आमदार झाल्यानंतरच त्यांनी बुधवारी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर अनपेक्षितपणे राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे आली आहे. सुनेत्रा पवार या बारामती विधानसभा निवडणुकीत निवडून आल्या असल्याने त्यांनी आपला राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे. नियमानुसार दोन्ही सभागृहात निवडून आलेल्या व्यक्तीला एका सभागृहाचा राजीनामा 14 दिवसांच्या आत देणं बंधनकारक असते.

Exit mobile version