। अलिबाग । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील सहाणगोठी येथील रहिवासी मिनिडोअर इको संघटनेचे सभासद सुनील गोपीनाथ पोईलकर यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी (दि. 14) निधन झाले. निधनसमयी ते 55 वर्षांचे होते. शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती. सहाण ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे. सहाणच्या माजी उपसरपंच सौंदर्या पोईलकर यांचे ते पती होत. सुनील पाईलकर यांच्या निधनाचे वृत्त समजताच पंचक्रोशितील नागरिकांनी त्यांच्या निवासस्थानी दाखल होत पार्थिवाचे दर्शन घेतले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, मुलगा, भाऊ असा परिवार आहे. कै. सुनील यांच्या पार्थिवावर सहाणगोठी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मिनिडोअर ईको संघटनेच्यावतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.