राज्य पतसंस्था फेडरेशनच्या उपकार्याध्यक्षपदी सुरेश पाटील

| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग येथील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक सुरेश गणपत पाटील यांची महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या उपकार्याध्यक्षपदी निवड झाली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या 21 संचालकपदाची निवडणूक झाली, त्यात सुरेश पाटील बिनविरोध निवडून आले . महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या संचालकांमधून नवीन पदाधिकार्‍यांची निवड करण्यासाठी 3 जानेवारी रोजी सभा झाली. उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले.

यासभेत ओमप्रकाश तथा काकासाहेब कोयटे (अहमदनगर) यांची अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. अलिबागच्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक सुरेश पाटील यांची उपकार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या उपकार्याध्यक्षपदी सुरेश पाटील यांची निवड झाल्याबद्दल रायगड जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातुन त्यांचे अभिनंदन होत आहे.

Exit mobile version