| मुंबई | वार्ताहर |
सूर्यकुमार यादवने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात आपली 63वी धावा करताच आणखी एक विक्रम केला. आयपीएलच्या इतिहासात 3000 धावा करणारा तो 22 वा खेळाडू ठरला आहे. अशी कामगिरी करणारा तो 16वा भारतीय ठरला आहे. त्याच्या आधी विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, शिखर धवन, सुरेश रैना, एमएस धोनीसह अनेक दिग्गज खेळाडूंनी हे यश मिळवले आहे. त्याचबरोबर आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. या लीगमध्ये त्याच्या 7044 धावा आहेत.