| कर्जत | प्रतिनिधी |
सुधाकरभाऊ घारे फाऊंडेशन पुरस्कृत रायगड जिल्हा मानांकन जिल्हा कॅरम स्पर्धेचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. या स्पर्धेत जिल्ह्यातील 152 खेळाडूंनी सहभाग घेतला असून, ही स्पर्धा दोन दिवस चालणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयातील सभागृहात या कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी मा. सरपंच मधुकर घारे यांच्यासह रायगड जिल्हा कॅरम असो.चे अध्यक्ष गिरीश तुळपुळे, खजिनदार वैभव पेठे, सह सचिव अभिजीत तुळपुळे, प्रकाश पालकर, मनोहर पाटील, उमेश गायकवाड, सोमनाथ ठोंबरे, दीपक लाड, महेंद्र चंदन, शरद हजारे, केतन बेलोसे, अनिल मोरे, प्रशांत चंदन, कुमेश मोरे, प्रेम लाड आदी उपस्थित होते. या स्पर्धेचे प्रमुख पंच म्हणून आशिष बागकर, सहाय्यक पंच म्हणून राजन पांचाळ, दीपक सिनलकर तर तांत्रिक अधिकारी म्हणून दीपक पांचाळ काम पहात आहेत. एकूण 151 सामने होणार असून सुमारे प्रत्येक दीड तासाला 18 सामने होणार आहेत.