| चिरनेर । वार्ताहर ।
झी मराठी वाहिनी वरील महिला वर्गात लोकप्रिय ठरलेली अर्थात आदेश बांदेकर यांच्या होम मिनिस्टर या मालिकेचा विषय महिला वर्गात आकर्षणाचा ठरला आहे. दरम्यान आदेश बांदेकर प्रस्तुत होम मिनिस्टर या झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेल्या कार्यक्रमांमध्ये 900 महिला स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला होता. यामध्ये मुंबई येथे बांदेकर यांनी मुलाखतीतून स्पर्धक म्हणून विचारलेल्या प्रश्नांना उरण तालुक्यातील चिरनेर येथील स्वाती मोकल यांनी अचूक उत्तरे दिली. त्यामुळे त्यांची पहिल्या फेरीत निवड झाली. मात्र दुसर्या फेरीत विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाही त्यामुळे त्या या फेरीत बाद झाल्या. मात्र पहिल्या फेरीत दिलेल्या अचूक उत्तरांची दखल घेत, त्यांना चांदीच्या कुंकवाच्या करंड्याची भेट वस्तू बांदेकर यांच्या हस्ते देण्यात आली.
दरम्यान मोकल यांच्या यशाचे कौतुक करण्यासाठी अभिनव मित्र मंडळाच्या वतीने त्यांच्या सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी नितेश पंडित, पपन पाटील, जीवन डाकी यांच्या हस्ते मोकल यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र भगत यांनी केले.