कर्जतमध्ये स्विपर मशीन बंद अवस्थेत

प्रशिक्षित वाहन चालकाची कमतरता
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत नगरपरिषद हद्दीतील सिमेंटक्रॉक्रिटच्या रस्त्यांवरील पडलेला कचरा उचलण्यासाठी 2019 मध्ये तब्बल 47 लाख 37 हजार खर्च करून स्विपर मशीनची खरेदी केली होती. मात्र तांत्रिक यंत्रणा कार्यान्वित नसल्याने कर्जत नगरपरिषदेच्या कार्यालयाबाहेर हे स्वीपर मशीन बंद अवस्थेत पडून आहे. एक महिना देखील ते कर्जत शहरातील रस्ते धूळ विरहित करण्यासाठी चालविले गेले नाहीत.
कर्जत शहरातील बहुतेक मुख्य रस्ते हे आरसीसी सिमेंटचे बनले आहेत. त्या रस्त्यांवर सातत्याने धूळ विरहित कचरा गोळा झाल्यास वाहने तेथून गेल्यानंतर श्‍वसनाचे आजार जडू शकतात आणि त्यामुळे काँक्रीटचे रस्ते धूळ विरहित असावेत यासाठी स्वीपर मशीन खरेदी करण्यात आले. पण ट्रक चालविण्यासाठी डिझेल आणि प्रशिक्षित वाहन चालकावर किती खर्च येईल याचा ठोकताळा न घेतल्याने आजच्या घडीला हा स्विपर ट्रक नगर परिषदेसाठी पांढरा हत्ती ठरला आहे. स्विपर ट्रक चालविण्यासाठी विशेष प्रक्षिशित वाहन चालकाची गरज भासते. तसा चालक कर्जत नगरपरिषदेकडे सध्या उपलब्ध नाही. तसेच आठवड्यातील फक्त तीन दिवस जरी शहरात गाडी फिरवायची म्हंटली तरी तब्बल 18 हजारांचे डिझेल लागते. त्यामुळे हि गाडी नगर परिषदेने खरेदी केल्यापासून कित्येक महिने एकाच जागेवर धूळखात उभी आहे. त्यामुळे कर्जत नगर परिषदेने जनतेच्या पैशातून स्विपर ट्रक खरेदी करण्याचा घाट कशासाठी आणि कोणाच्या फायद्यासाठी घातला होता?हा प्रश्‍न नागरिक विचारू लागले आहेत.

स्विपर ट्रक चालविण्याचे चालकाला प्रक्षिक्षण नसल्याने रस्त्यावरील कचरा साफ करण्याऐवजी गोल फिरणारे ब्रशचा रस्त्यावर जास्त दबाव पडत असल्याने रस्त्यालाच बाधा पोहोचण्याची शक्यताच जास्त आहे.
राजेश लाड, माजी नगराध्यक्ष.


गर परिषदेने स्विपर ट्रक खरेदीचा घाईगडबडीत घेतलेला निर्णय चुकीचा असून या गाडीचा रस्ते साफसफाईसाठी अपेक्षित असा उपयोगच होत नाही आणि निधी वाया गेला आहे.
अमोध कुलकर्णी, माहिती अधिकार कार्यकर्ते

Exit mobile version