नोकरीबाबत निर्णय घ्या अन्यथा गेट बंद आंदोलन

| उरण | वार्ताहर |

उरण तालुक्यातील भेंडखळ येथील बी.पी.सी.एल कंपनीसाठी जमीन संपादित करून सुध्दा, नोकरी न देणार्‍या बी.पी.सी.एल कंपनीच्या आन्यायाविरोधात आमरण उपोषण करणार्‍या अविनाश रमण ठाकूर यांच्यासह इतर शिल्लक राहिलेले दाखला धारक प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीबाबत निर्णय न घेतल्यास 9 नोव्हेंबरला गेट बंद आंदोलन करण्यात येईल. असा इशारा माजी आ. मनोहर भोईर व उरण विधानसभा संपर्कप्रमुख महादेव घरत यांनी बी.पी.सी.एल. कंपनी प्रशासनाला बैठकीत दिला आहे. या बैठकीस भूषण पाटील, प्रा. एल.बी पाटील, सुधाकर पाटील, सीमा घरत, संध्या ठाकूर, सचिन पाटील, लक्ष्मण ठाकूर, सूनित घरत , कृष्णा ठाकूर, योगिता ठाकूर, चित्रा ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल पाटील, बीपीसीएल प्रशासनातील अधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version