गोवंशाची हत्या करणार्‍यांवर कठोर कारवाई करा; तहसील, पोलिसांना निवेदन

। मुरुड । प्रतिनिधी ।
मुरूड तालुक्यातील घडलेल्या गोवंश हत्या करणार्‍या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नऊ गाव आगरी समाजाने केली आहे. संबंधित गुन्ह्यातील गुन्हेगारांवर पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, तसे न झाल्यास नऊ गाव आगरी समाजातर्फे जन आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. अशा स्वरूपाचे निवेदन मुरुड तहसीलदार रोहन शिंदे व स.पो.नि. राहुल अतिग्रे यांना नऊ गाव आगरी समाजातर्फे देण्यात आले आहे.

गुरुवार दि. 27/10/2012 रोजी गांव पारगाण, ता. मुरुड जंगलात बैल व गायी कापल्या असल्याचे तसेच त्याबाबत मुरुड पोलीस ठाण्यात याबाबत संबंधित शेतकर्‍यांनी तक्रारी दिली आहे. तालुक्यातील अनेक गावांमधील अनेक गुरे अवैधरित्या पळवून ती कापून मटण विक्री करणे, असे बेकायदेशीर कृत्य होत आहे. त्यानंतर पोलिसांत तक्रार दिल्यानंतर अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या गुन्हेगारांस शोधून त्यांच्या विरुद्ध गोवंश हत्या बंदी कायदया अंतर्गत फौजदारी कारवाई होणे गरजेचे आहे. अन्यथा अशा घटना वारंवार होत राहिल्यास हिंदू समाजात असंतोष निर्माण होईल, असे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी नऊ गाव आगरी समाज संघटनेचे अध्यक्ष तुकाराम पाटील, उपाध्यक्ष नरेश वारगे, सचिव संदीप कमाने, खजिनदार आदेश भोईर, मढवी लक्ष्मण वारगे, अ‍ॅड. दत्ता पाटील, अ‍ॅड. मानसी बैकर, रिंकल दुसार, प्रविण बैकर, धर्मा हिरवे, अ‍ॅड. मनिष माळी यांच्यासह असंख्य समाज बांधव उपस्थित होते.

Exit mobile version