| चेन्नई | वृत्तसंस्था |
तामिळनाडूच्या मदुराई येथे ट्रेनला भीषण आग लागली. यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला. अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. रेल्वेमधून गॅस सिंलेंडरची तस्करी केली जात असल्यामुळे आग लागल्याचे कारण सांगितले जात आहे. मदुराई रेल्वे स्थानकावर IZD-रामेश्वरम एक्स्प्रेसमध्ये ही घटना घडल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले. दहाही बळी उत्तर प्रदेशातील रहिवासी असल्याचे सूत्रांनी सांगितले. आग लागलेल्या डब्यात एकूण 55 प्रवासी होते, असे सांगण्यात येत आहे.