। कर्जत । प्रतिनिधी ।
कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांची नुकतीच रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर नगरपरिषद येथे बदली झाली आहे. त्यांच्या रिक्त जागेवर मंगळवारी (दि.25) नांदेड जिल्ह्यातील देगलूर या नगरपरिषदेतील तानाजी चव्हाण हे रुजू झाले आहेत.
सप्टेंबर 2022 रोजी कर्जत नगरपरिषदेवर वैभव गारवे यांची मुख्याधिकारी म्हणून नेमणूक झाली होती. कर्जत नगरपरिषदेतील लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ गेली वर्षभरापूर्वी संपलेला असल्याने पालिकेचे संपूर्ण कामकाज प्रशासक म्हणून मुख्याधिकारी वैभव गारवे हाताळत होते. परंतु, त्यांच्याकडून येथील समस्येंचा निपटारा होत नव्हता. त्यामुळे या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी आता नव्याने रुजू झालेले मुख्याधिकारी तानाजी चव्हाण पुरे पडतात का, याकडे समस्त कर्जतकरांचे लक्ष लागून राहिले आहे.