रेल्वे वाहतूक विस्कळीत, पालकांकडून पोलिसांवर दगडफेक
। बदलापूर । प्रतिनिधी ।
बदलापूरमधील एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याने पालकांचा उद्रेक झाला आहे. सकाळपासूनच नागरिकांनी शाळेबाहेर ठिय्या आंदोलन केले असून बदलापूर स्थानकात रेल रोकोदेखील केला आहे.
अशातच आता चिमुकल्यांना न्याय मिळवण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले आहे. बदलापूर स्थानकात आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरूवात केली आहे. तर, दुसरीकडे शाळेचे गेट तोडून आंदोलक आतमध्ये घुसून त्यांनी शाळेची नासधूस करण्यास सुरुवात केली आहे. तसेच, रेल रोको आंदोलन केल्यामुळे मुंबई लोकलसह मेल व एक्सप्रेसची वाहतूक विस्कळीत झाली आहे.