घरफोडी करणारा पोलिसांच्या जाळ्यात

। कोलाड । वार्ताहर ।
पुई येथील दिलीप दिसले यांच्या घरावर चोरट्याने डल्ला मारण्याचा पयत्न केला मात्र दिसले यांच्या सतर्कतेने चोरीचा डाव फसला व चोराला पकडण्यात यश आले असून या चोरास पोलिसानी अटक केली आहे. दरम्यान या बाबत अधिक माहिती अशी की, रविवार दि.19 रोजी फिर्यादी दिलीप दिसले यांच्या राहते घरात आरोपी मोशीन शेख रा.सुहाना अपार्टमेंट दिघी रोड ता.म्हसळा हा चोरी करण्याच्या इरादयाने फिर्यादी रा.पुंई पो.कोलाड, ता.रोहा यांचे राहते घराच्या पाठीमागील उघडया दरवज्यावाटे आत किचनमधे ज़़ावुन डबे उघडून मौल्यवान वस्तु चाचपणी करताना मिळुन आला. सदर गुन्ह्यातील आरोपीस अटक करण्यात आली आहे.याबाबत कोलाड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून कोलाड़ सपोनी सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शना खाली अधिक तपास पोह व्ही.डी.शिद हे करीत आहेत.

Exit mobile version