जितेंद्र आव्हाडांची पोस्ट चर्चेत
। मुंबई । वृत्तसंस्था ।
राज्याचे गृहविकास मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे एक ट्विट सध्या चर्चेत आले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी एका बिल्डरची नोकरीविषयक जाहिरात शेअर केली असून, यातील एका निकषावर त्यांनी आक्षेप घेतला आहे. ही पोस्ट करताना हा जातीभेद नाही का? आणि आम्ही बहुजन समाजाची बाजू घेतली की गुन्हेगार, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
आव्हाड यांनी शेअर केलेली जाहिरात ’आराधना बिल्डर्स अँड डेव्हलपर्स’ या ठाणे येथील बांधकाम कंपनीची आहे. या जाहिरातीमध्ये महिलांसाठी असलेल्या ’सेल्स आणि मार्केटिंग’ या पदासाठी अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
या पदासाठी सहा निकष निश्चित करण्यात आले आहेत. यांपैकी एका निकषामध्ये ब्राह्मण समाजाच्या उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल असं म्हटलं आहे. नेमक्या याच मुद्द्यावर आव्हाड यांनी आक्षेप घेतला आहे. आव्हाडांनी ट्विटरवर शेअर केलेल्या या पोस्टला अनेकांनी प्रतिसाद दिला असून अनेक कमेंटही आल्या आहेत. अनेकांनी ही पोस्ट रिट्विटही केली आहे.
बहुजनांची बाजू घेतली की गुन्हेगार
