धोकादायक ठरणारे खड्डे बुजवले

। नवीन पनवेल । वार्ताहर ।
प्रवाशांना धोकादायक ठरणारे खड्डे मनसे आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी बुजवले आहेत. पनवेल तालुक्यातील टेमघर-उमरोलीच्या रस्त्यावर जीवघेणा खड्डा पडला होता. या खड्ड्यात एका तरुणाची बाईक आदळली. यात तो जखमी झाल्याची घटना घडली. त्यानंतर दुसर्‍या दिवशी हा खड्डा येथील स्थानिकांनी बुजवला. यावेळी खड्डे बुजविताना येणा-जाणार्‍या वाहन चालकांनी आभार मानले. येथील छोट्या पुलाजवळ रस्ता खचला आहे त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने येथे रस्ता ताबडतोब दुरुस्त करावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी मनसेचे विश्‍वास पाटील, दिनेश मांडवकर विद्याधर चोरघे, अमय गांगण, रुपेश यादव, सा पंकज तांबडे, विनोद पवार, सूर्यवंशी ,शांताराम जाधव आनंद जाधव उपस्थित होते.

Exit mobile version