तीन पदके मिळवून अलिबागचे नाव केले रोशन
। सिद्धी भगत । अलिबाग ।
नुकत्याच गोव्यात पार पडलेल्या ट्रॅडिशनल रेसलिंग राष्ट्रीय स्पर्धेत अलिबागमधील मानी गावात राहणारी परी उमेश माळवी हीने घवघवीत यश संपादन करून अलिबागची मान ताठ केली आहे.
गोव्यात 29 व 30 ऑक्टोंबर रोजी ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत वयोगटाप्रमाणे अनेक स्पर्धा झाल्या त्यामध्ये 11-12 वयोगटातुन अलिबग तालुक्यातील मानी गावात राहणार्या परी माळवीने आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रर्दशन केले व दोन सुवर्ण व एक रौप्य पदक मिळवले आहे. या आधीही अनेक कराटे स्पर्धांमध्ये तीने सहभाग घेऊन यश संपादन केले आहे. गोव्यात झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत परीने 11-12 वर्षे वयोगटात बेल्ट रेसलिंग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक, मास रेसलिंग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक व कराटे काताज स्पर्धेमध्ये रौप्यपदक अशा तीन पदकांची मानकरी ठरत परी माळवी ही ट्रॅडिशनल रेसलिंग राष्ट्रीय स्पर्धेत रायगड जिल्ह्यातली पहिली कन्या ठरली आहे व तीने अलिबागची शान राखुन अलिबागचे नाव रोशन केले आहे.