। मुरूड-जंजिरा । वार्ताहर ।
श्रीगुरू सावर्डेकर महाराज संस्थापीत रूद्ररेवा सेवा प्रतिष्ठान, आळंदी देवाची अंतर्गत श्रीगुरूमाता सेवाश्रम नांदगाव श्री सिध्दाविनायक मंदिरासमोर विनामुल्य वृध्दाश्रम, अनाथाश्रम या सेवाप्रकल्पाचा शिलान्यास समारंभ रविवारी (दि.12) संपन्न झाला.
श्रीगुरूमाता सेवाश्रम नांदगाव येथे समाजातील अनाथ, निराधार, गरजू, गरीब, वृध्दांसाठी व बालकांसाठी हक्काचे विनामुल्य आश्रयस्थान निर्माण होत आहे. तसेच, श्री विठ्ठल गुरूकुलम या नावाने संस्कारक्षम व आदर्श समाज निर्मितीसाठी संस्कृत, गीता, भागवत, रामायण, कीर्तन, प्रवचन, आगमोक्त परंपरागत यज्ञ पाठशाळा इत्यादी शिक्षण देणारी विनामुल्य वारकरी शिक्षण संस्था निर्माण होणार आहे.