ग्रामपंचायतीमध्ये लोकनियुक्त सरकार असावे

ग्रामस्थांची इच्छा, निवडणुकीडे लक्ष
दीड वर्षांपासून पोट, पाली तर्फे कोतवाल खलाटी ग्रा.पं.वर प्रशासक

| नेरळ | वार्ताहर |

कर्जत तालुक्यातील पोटल ग्रुप ग्रामपंचायतीचे विभाजन झाले आणि त्यातून पोटल तसेच पाली तर्फे कोतवाल खलाटी अशा दोन नवीन ग्रामपंचायती तयार झाल्या आहेत. पोटल ग्रामपंचायतीचे विभाजन 31 जानेवारी 2020 रोजी झाले असून, अद्याप त्या दोन्ही नवीन ग्रामपंचायतींच्या निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे आजही प्रशासकांकडे या दोन्ही ग्रामपंचायतींचा कारभार आहे. दरम्यान, ग्रामपंचायतीमध्ये लोकनियुक्त सरकार असावे, अशी ग्रामस्थांची इच्छा आहे.


नव्याने तयार झालेल्या पोटल ग्रामपंचायत मध्ये पोटल तसेच आंबोट गाव कोळंबे वाडा, बौद्ध वस्ती यांचा समावेश आहे, तर पाली तर्फे कोतवाल खलाटी या नवीन ग्रामपंचायतीमध्ये पाली गाव तसेच पाली वाडी, आंबेवाडी, मोहमाल आणि बुद्धवाडा यांचा समावेश करण्यात आला आहे. नवीन ग्रामपंचायतीचे निर्मिती झाल्यानंतर एकत्रित पोटल ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी अनिल पवार यांच्याकडे ग्रामविकास अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली.त्यानंतर विभाजन झाले आणि लगेच कर्जत पंचायत समितीकडून पाली तर्फे कोतवाल खलाटी आणि पोटल नव्याने निर्माण झालेल्या ग्रामपंचायतीसाठी प्रशासक नेमले गेले. कर्जत पंचायत समितीमधील कृषी विस्तार अधिकारी डी.के. राठोड यांच्याकडे प्रशासकपदाची जबाबदारी असून, गेली दीड वर्षे तेच प्रशासक आहेत. दीड वर्षातील पहिला वर्षात कोव्हिडमुळे ग्रामसभा घेण्याचीदेखील परवानगी नव्हती. मात्र, त्यानंतर मागील महिन्यात तीन ग्रामसभा झाल्या असून, त्या ग्रामसभा यांना ग्रॅम्सटाऊनची चांगली उपस्थित राहिली आहे.

निवडणूक कधी?
पोटल ग्रामपंचायतमध्ये तीन प्रभागातून नऊ सदस्य निवडले जाणार असून, पाली तर्फे कोतवाल खलाटी या ग्रामपंचायतमध्ये तीन प्रभागातून सात सदस्य निवडले जाणार आहेत. मात्र, वॉर्ड रचना करण्यात तब्बल एक वर्षे फुकट गेले असून, आतापर्यंत एकवेळ येथील निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतरदेखील सार्वत्रिक निवडणूक होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. जानेवारी 2020 पासून पोटल आणि पाली तर्फे कोतवाल खलाटी या दोन्ही दीड वर्षे प्रशासक आहे.

नव्याने निर्माण झालेल्या पोटल आणि पाली तर्फे कोतवाल खलाटी या दोन्ही ग्रामपंचायत मध्ये सार्वत्रिक निवडणुकीसाठी कर्जत तहसील कार्यालयाच्या निवडणूक शाखेने दोन्ही ठिकाणी प्रभाग रचना जाहीर केली आहे.त्याचवेळी मतदार यादी 22 जून रोजी प्रसिद्ध केली जात आहे. या वर्षात पाली आणि पोटल खलाटी या दोन्ही ग्रामपंचायत मध्ये सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम राबविला जाईल.

भारती, अव्वल कारकून, कर्जत तहसील कार्यालय

ग्रामस्थांना आवश्यक सर्व कागदपत्रे वेळोवेळी दिली जात असून, 14 आणि 15 वित्त आयोगाच्या निधीमधून सर्व कामेदेखील दोन्ही नवीन ग्रामपंचायतीमधून पूर्ण करण्यात आली आहेत. मात्र, निवडणूक लागली पाहिजे आणि ग्रामस्थांना लोकनियुक्त शासन मिळायला हवे.

बजरंग श्रीखंडे, माजी सदस्य, पोटल ग्रामपंचायत
Exit mobile version