। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत पंचायत समिती शिक्षण विभागाच्यावतीने रायगड जिल्हा परिषद शाळेत शिकविणार्या शिक्षकांच्या क्रीडा स्पर्धेंचे प्रथमच आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी वंजारपाडा येथील माथेरान व्हॅली स्कूल यांनी मैदान उपलब्ध करून दिले होते. स्पर्धेत लगोरी, कबड्डी, धावणे, दोरीउडी, गोळाफेक, थाळीफेक, लांबउडी आदी खेळांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत शिकविणारे 330 शिक्षक सहभागी झाले होते. त्यात नेरळ आणि कशेळे हे बीट क्रीडा स्पर्धेत आघाडीवर राहिले.
या स्पर्धेत पुरुषांच्या लगोरी गटात प्रथम कशेळे बीट, महिलांमध्ये नेरळ बीट, कबड्डी पुरुष गटात वारे केंद्र तर महिला गटात कशेळे केंद्र यांनी बाजी मारली आहे. तर, दोरीउडी, गोळाफेक, थाळीफेक, लांबउडी आणि धावण्याच्या स्पर्धा या वैयक्तिक स्तरावर घेण्यात आल्या होत्या. दिवसभर चाललेल्या क्रीडा महोत्सवात पंच म्हणून यशवंत वाघरे, जयवंत पारधी, स्वप्नील नामदास, विशाल राठोड यांनी काम पाहिले. तर, स्पर्धेचा बक्षीस समारंभ तालुका गटशिक्षण अधिकारी संतोष दौंड, तसेच विस्तार अधिकारी अरुण पारधी, देविदास जाधव, गट समन्वयक किशोर पाटील, समीर येरुणकर आणि मुख्याध्यापक मृदुला पटेल यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी कर्जत शिक्षण विभागाचे केंद्र प्रमुख मोहन पाटील, अरुणा गंगावणे, नारायण सोनावणे, रवींद्र सोनावळे, बाळासाहेब पालवे, पद्माकर म्हात्रे, चंद्रशेखर जूईकर, मंगेश कर्पे, अनंत खैरे, माधुरी पाटील, विभिषण नवले, उज्ज्वला मोरे, विष्णू साबळे, कांचन पाटील आदी उपस्थित होते.
शिक्षक क्रीडा महोत्सव निकाल
लगोरी : पुरुष- कशेळे बीट प्रथम, नेरळ बीट द्वितीय. महिला- नेरळ बीट प्रथम, कशेळे बीट द्वितीय.
कबड्डीः पुरुष- वारे केंद्र प्रथम, जामरंग केंद्र द्वितीय. महिला- कशेळे बीट प्रथम, नेरळ बीट द्वितीय.
धावणे : पुरुष- दिनकर बागुल प्रथम, संभाजी पथारे द्वितीय, यश वेखंड तृतीय. महिला- वैशाली कुटे प्रथम, अर्चना गोड द्वितीय, आंबरे तृतीय.
दोरी उडीः अश्विनी गायकवाड प्रथम, सुनीता शितोळे द्वितीय, सुरेखा बोर्हाडे तृतीय.
गोळा फेकः पुरूष- किशोर बडाख प्रथम, राजेंद्र शिंदे द्वितीय, सचिन पुंड तृतीय. महिला- अनिता कडलग प्रथम, भारती माळी द्वितीय.
थाळी फेकः हरिश्चंद्र दहिफळे प्रथम, मोरमारे द्वितीय, विशाल हांडे तृतीय.
लांब उडीः संभाजी पथारे प्रथम, सचिन पुंड द्वितीय, राजेंद्र शिंदे तृतीय.