ऑलम्पिकमध्ये कोरोनाचा वाढता धोका

आणखी दोन खेळाडूंना कोरोनाची बाधा
टोक्यो | वृत्तसंस्था |
बहुप्रतिक्षित टोक्यो ऑलम्पिक सुरु होण्यास काहीच दिवस शिल्लक आहेत. मात्र, अजूनही कोरोनाचे सावट स्पर्धेवर असून, बर्‍याच देशांतील संघांच्या खेळाडूंना आणि सपोर्ट स्टाफला कोरोनाची लागण होत आहे. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, ऑलम्पिकमध्ये भाग घेणार्‍या आणखी दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे.

टोक्यो ऑलम्पिकशी संबंधित दोन अधिकार्‍यांनी ही माहिती रविवारी (18 जुलै) दिली. याआधीच कोरोनाचा शिरकाव ऑलम्पिक स्पर्धेतील खेळाडूंना झाला असताना, आणखी कोरोना केसेस वाढत असल्यामुळे जपान सरकारसोबत ऑलम्पिक समितीची डोकेदुखीही वाढत आहे. आधीपासूनच कोरोनाच्या संकटामुळे स्पर्धेला होणारा विरोध वाढत्या कोरोनाबाधितांमुळे आणखीच वाढला आहे.

Exit mobile version