| मुंबई | प्रतिनिधी ।
म्हाडा मुंबई मंडळाच्यावतीने 2020 मध्ये बॉम्बे डाईंग मिल व श्रीनिवास मिलमधील गिरणी कामगारांसाठी सोडत काढण्यात आली होती. त्यामध्ये पात्र ठरलेल्या, पैसे भरलेल्या 142 गिरणी कामगारांना आणि त्यांच्या वारसांना घरांच्या चावीचे वाटप करण्यात आले. वांद्रे पूर्वेतील म्हाडा मुख्यालयात हा कार्यक्रम पार पडला.
या वेळी गिरणी कामगार घर सनियंत्रण समितीचे अध्यक्ष आमदार सुनील राणे, आमदार कालिदास कोळंबकर उपस्थित होते. आतापर्यंत म्हाडाने सुमारे 2,500 कामगारांना घरांचे वाटप केले असून नुकताच पनवेलनजीकच्या कोन येथील 585 सदनिकांचे गिरणी कामगारांना वाटप करण्यात आले आहे. दरम्यान, आतापर्यंत एक लाख सहा हजार गिरणी कामगारांनी पात्रता निश्चित करण्यासाठी म्हाडाकडे अर्ज केले आहेत. त्यापैकी 87 हजारांहून अधिक अर्ज पात्र ठरले असून, उर्वरित अर्जांची छाननी सुरू असल्याचे आमदार राणे यांनी सांगितले.