उड्डाणपुलावरून मिनीबस कोसळली

। पनवेल । वार्ताहर ।
खारघर स्टेशनच्या उड्डाणपुलावरून एक मिनीबस खाली कोसळून बस चालक जखमी झाल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. खेड येथून मिनीबस चालक इरफान खान हा त्याच्या ताब्यातील बस घेऊन मीरा रोड येथे जात असताना खारघर स्टेशनच्या उड्डाणपुलावर अचानकपणे एका कंटेनरने बसला धडक दिली. या अपघातात बस चालकाचा गाडीवरील ताबा सुटून स्टेरिंग लॉक झाले. त्यामुळे बस डाव्या बाजूला उड्डाणपुलावरून खाली कोसळली. यात बस चालक किरकोळ जखमी झाला आहे. सुदैवाने या गाडीत प्रवासी नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

Exit mobile version