म्हसळा! अनेकांची निराशा; चारही गणात महिलांना संधी

। म्हसळा । प्रतिनिधी ।
म्हसळा तालुक्यातील पंचायत समितीच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम गुरुवारी (दि.28) संपन्न झाला. चारही गणात महिलांना संधी मिळाली असल्याने इच्छूक पुरुष उमेदवारांची मात्र निराशा झाली. नगरपंचायत हद्द सोडून तालुक्याची लोकसंख्या 49,737 एवढी असून त्यानुसार आरक्षण निश्‍चित करण्यात आले आहे.

एकूण चार गणापैकी मेंदडी नामाप्र (खुला), पाभरे सर्वसाधारण स्त्री, वरवठणे सर्वसाधारण स्त्री तर आंबेत सर्वसाधारण आरक्षण पडले असून गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या अनेकांना नाराजी पत्करण्याशिवाय दुसरा काहीही उपाय राहिला नसल्याचे आरक्षणावरून स्पष्ट होते.

आरक्षणासाठी निरीक्षक म्हणून प्रांताधिकारी अमित शेडगे तर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार समीर घारे यांनी जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली. सात वर्षाच्या अनुष्का रमेश जाधव हिच्या हस्ते सोडत काढण्यात आली. याप्रसंगी नायब तहसीलदार धर्मराज पाटील तसेच महसूल विभागातील कर्मचारी तसेच विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version