श्रमदानातून रस्त झाला खड्डेमुक्त

| मुरूड | वार्ताहर |
सामान्य नागरिक रमेश पुलेकरने मुरुड समुद्रकिनारी पार्वती लॉजजवळ पडलेले भले मोठे श्रमदानातून भरले आहेत. या ठिकाणी अनेक दुचाकी वाहन खड्ड्यांमुळे पडून अपघात होत होते. हे डोळ्यांदेखत सतत होणारे अपघात पाहून रमेश पुलेकरने स्वतः खड्डे भरण्याचा निर्णय घेतला. व जवळच असलेल्या रॅबीटचा वापर करून हे मोठे खड्डे भरले. त्यामुळे वाहन चालकांना दिलास मिळाला आहे. मुरूड समुद्रकिनार्‍यावरील रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येत आहे. या खड्ड्यांकडे सा.बां. विभाग आतातरी लक्ष देईल का? असा सवाल जनमानसातून केला जात आहे. रमेश पुलेकरने केलेल्या या श्रमदानामुळे तूर्तास तरी वाहन चालकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे रमेशवर सर्व स्तरावरुन कौतुकांचा वर्षाव होत आहे.

Exit mobile version