। अलिबाग । प्रतिनिधी ।
श्रीवर्धन तालुक्यातील श्री. घन:श्याम तळवटकर एज्युकेशन सोसायटी संचलित, दिघी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या बारावीचा (वाणिज्य) निकाल शंभर टक्के लागला आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षीदेखील या महाविद्यालयाने आपल्या यशाची परंपरा कायम ठेवली आहे.
यंदा या विद्यालयात एकूण नियमित सात विद्यार्थिनी प्रविष्ट झाल्या होत्या. त्यातील गुणांक्रमे आलेल्या विद्यार्थिनींमध्ये रुमाना परकार हीने 77.69 टक्के गुण मिळवून कॉलेजमध्ये प्रथम क्रमांक तसेच जुहा दळवी हीने 75 टक्के गुण मिळवून कॉलेजमध्ये द्वितीय क्रमांक मिळविला आहे. त्याचबरोबर जैनब सैबोले हीने 73 टक्के गुण मिळवून कॉलेजमध्ये तृतीय क्रमांकाने उतीर्ण झाली आहे. या विद्यार्थिनींच्या यशाबद्दल कॉलेजचे मुख्याध्यापक सचिन मापुस्कर व संस्था प्रमुख रंजना तळवटकर यांनी सर्व मुलींचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.