वेश्‍वी फसवणूक प्रकरण! दागिने पळविणारी महिला जेरबंद

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
सरकारी नोकरीमध्ये उच्च पदावर कामास असल्याचे सांगून सोन्याचे पळविणार्‍या महिलेला जेरबंद करण्यात रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले आहे.त्या महिलेच्या चौकशीत तिने पोयनाड तसेच पुणे, बीड आणि लातूरमध्ये देखील अशा प्रकारे फसवणुक केल्याचे उघडकीस आले आहे.याप्रकरणी अलिबाग तालुक्यातील वेश्‍वीतील महिलेने तिच्याविरोधात अलिबाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.पोलीस अधीक्षकांनी सदर गुन्हयाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शास्त्रा रायगड अलिबाग कडे वर्ग करण्याचे आदेश दिले होते. पोलीस अधीक्षकांनी सदर गुन्हयाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शास्त्रा रायगड अलिबाग कडे वर्ग करण्याचे आदेश दिले होते.

या गुन्ह्याचा तपासअंमलदार सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश कदम यांच्या नेतृत्वाखाली पथकाने केला. पथकामार्फत गुन्हयातील अनोळखी महिलेचा शोध चालू होता. तपासादरम्यान पथकातील पोहवा प्रशांत दबडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तसेच तांत्रिक विश्‍लेषणाव्दारे संशयित महिलेस ताब्यात घेवून तिच्याकडे चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच तिने अलिबाग शहरामध्ये अन्य एका ठिकाणी तसेच पोयनाड परिसरामध्ये अशाच प्रकारचे गुन्हे केल्याचेही तिने सांगितले.

महिला आरोपीचे नाव मंगल रविंद्र मोरे (वय 54) उर्फ विमल श्रीकांत सुर्यवंशी, रा. मु.पो. म्हाते बु. ता. जावळी, जि. सातारा सध्या रा. रूम नं. 4. तळमजला श्रेयश को. ऑप. हौ. सोसायटी, बांगरवाडी, लोणावळा, जि.पुणे मुळ रा. जनता वसाहत विठठलवाडी, जकात नाका, सिंहगड रोड, जि.पुणे असे असून तिला दिनांक 7 सप्टेंबर रोजी 4.45 वाजता अटक करण्यात आली. तिच्याकडून गुन्ह्यात लंपास केलेले एकूण 2 लाख 85 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.मिळालेल्या माहितीनूसार महिला आरोपीत ही सरकारी नोकरीस उच्च पदावर नोकरीस असल्याचे सांगून नुकतीच बदली होवून आली असल्याचे सांगत. सरकारी नोकरीस असल्याचे बनावट ओळखपत्र दाखवत. तसेच खोटे आधारकार्ड दाखवत असे. तसेच परिसरात एक रूम भाडयाने घेवून दिड ते दोन महिने ठिकाणी राहत. बदली झाल्यानंतर ज्या व्यक्तीच्या नावे त्या वस्तु घेतल्या आहेत, त्याच व्यक्तीला त्या वस्तू देवून जाणार असल्याचे अमिष दाखवून त्यांचा विश्‍वास संपादन करत असे.

त्या भाडयाच्या रूममध्ये त्याच व्यक्तीच्या नावावर नवीन टीव्ही, फ्रीज, वायफाय विकत घेत असे. जेणेकरून तिची कोणतीही ओळख उघड होवू नये. इतकेच नाही तर घरकाम करण्यासाठी घरी येणार्‍या महिलेचा संपुर्ण विश्‍वास संपादन झाल्यानंतर पुजेला जाण्याचे सांगून दागिने गावी विसरलेले असून तुमचे दागिने द्या, मी लगेच जावून येते असे सांगून सोन्याचे दागिने घेवून पलायन करीत. आरोपी महिला ही सरकारी नोकरीमध्ये उच्च पदावर असून तिची खुप ओळख आहे, असे सांगून गरीब गरजूंना नोकरीस लावण्याचे अमिष दाखवून त्यांचेकडून रोख रक्कम घेते.

महिला आरोपीत हिने रायगड जिल्हयातील अलिबाग, पुणे जिल्हयातील लोणावळा, बिड जिल्हयातील बर्दापूर तसेच लातूर जिल्हयातील मुरूड या ठिकाणी अशाच प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक रायगड अशोक दुधे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगड पोलीस निरीक्षक दयानंद गावडे अलिबाग यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश कदम, सहाय्यक फौजदार दिपक मोरे, पोहवा प्रशांत दबडे, अमोल खंडारे, अमोल हंबीर, अभियंती मोकल, सायबर सेल नेमणूकीतील पोशि अक्षय पाटील व पोशि तुषार घरत यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

Exit mobile version