पुरात अडकलेल्या पाच जणांच्या सुटकेचा थरार

वाइडर वेस्ट ॲडवेन्चर टीमची दमदार कामगिरी

। खांब । वार्ताहर ।

रोहा तालुक्यातील धानकान्हे गावापासून नदी किनारी असलेल्या फार्म हाऊसमध्ये नदीला आलेल्या पुरामुळे पाच जण तसेच गुरे, शेळ्या व अन्य पक्षी अडकले होते. यावेळी त्‍यांच्या सुटकेचा थरार पहायला मिळाला. अडकलेल्यांची माहिती येथील पांडुरंग गोसावी यांना मिळताच त्यांनी जीवरक्षक महेश सानप यांच्याशी संपर्क साधला. महेश सानप देखील आपली संपुर्ण टीम घेऊन हजर झाले व कंबरेहून अधिक वाहत्या पाण्यात बोटींच्या सहाय्याने फार्म हाऊस पर्यन्त पोहचून पाचही जणांना वाहत्या पाण्यातून सुरक्षितरित्या बाहेर काढले. यामध्ये गुरे, शेळ्या व अन्य पक्षी यांच्यासह एक सहा महिन्यांचे छोटे बाळही होते. वाइडर वेस्ट ॲडवेन्चर टीमच्या या दमदार कामगिरीबद्दल सर्वत्र कौतूक होताना दिसत आहे. तसेच, गावातील विश्वास राऊत, उमेश कचरे, निखिल हळदे, सचिन जाधव, महेश कचरे व अन्य युवा वर्गाने या टिमच्या मदतीसाठी मोलाचे सहकार्य केले.

Exit mobile version