| पाली/वाघोशी | वार्ताहार |
सुधागड तालुक्यात काही दिवसांपूर्वीच एका प्रियकराने आपल्या प्रियसीचा खून करून स्वतःदेखील आत्महत्या केली होती. ही घटना ताजी असतानाच तालुक्यातील नाडसूर येथील कोंडगाव ठाकूरवाडी येथे चारित्र्यावर संशय घेतल्याने पत्नीने पतीचा लोखंडी रॉडने मारून खून केला आहे. ही घटना शनिवारी (दि. 17) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास घडली. याबाबत रविवारी (दि.18) पहाटे 5.55 वाजता गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, हिरा सादुराम हंबीर हिचा पती सादुराम ताया हंबीर हा तिच्यावर चारित्र्याच्या संशय घेऊन भांडण करत होता. या भांडणाचा राग मनात धरून हिरा हिने लोखंडी एल आकाराच्या अँगलने सादुरामच्या चेहऱ्यावर, कपाळावर, डोक्यावर व डोक्याच्या मागे मारहाण करून गंभीर दुखापत केली. या महाराणीमध्ये सादुराम हंबीर याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज सूर्यवंशी हे पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण व उपविभागीय अधिकारी दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.