। पुणे । प्रतिनिधी।
पुण्यातील आळंदीच्या इंद्रायणी नदीत अज्ञात युवतीने उडी घेतली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 29) सकाळच्या सुमारास घडली. या घटनेनंतर महिलेचे शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
गुरुवारी सकाळच्या सुमारास इंद्रायणी नदीवरील भक्ती सोपान पुलाशेजारील नव्याने उभारण्यात आलेल्या स्कायवॉक पुलावरून एका महिलेने नदीपात्रात उडी मारली. मात्र ही महिला कोण आणि तिने असे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत अद्याप ही माहिती समोर आलेली नाही. या घटनेची माहिती आळंदी पोलीसांना मिळताच पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. तसेच, आळंदी अग्निशमन विभाग पथकाकडून इंद्रायणी नदीत या महिलेचा शोध सुरु आहे.