। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल शहरातील आनंद नगर परिसर सखी डिझायनर वेअरमध्ये अज्ञात चोरट्याने केलेल्या चोरीत जवळपास 69 हजार रुपयांची रोख लंपास केल्याची घटना घडली आहे. शहरातील आनंद नगर परिसरात असलेल्या सखी डिझायनर वेअर या दुकानात अज्ञात चोरट्याने मुख्य दरवाजा उघडून आत प्रवेश करून दुकानात असलेली 69 हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली आहे. या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.







