| पनवेल | वार्ताहर |
रस्त्यावर मोटार सायकल उभी करून कंपनीच्या आत फक्त बॅग आणण्यासाठी गेलेल्या इसमाची मोटार सायकल अज्ञात त्रिकुटाने नेल्याची घटना तळोजा एमआयडीसी येथे घडली आहे. या घटनेची नोंद तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
चिंचवली येथील अक्षय काडवले कामावरून घरी परत येत असताना त्यांनी फक्त बॅग घेण्यासाठी मोटार सायकल जगन्नाथ हॉटेलच्या मागील रस्त्यावर उभी केली असता, अज्ञात तीन इसमांनी त्याची 25 हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची बजाज कंपनीची प्लसर नेली. याबाबत अक्षय याने तळोजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.