| पनवेल | वार्ताहर |
गोडावूनमधील ऑफिस गाळ्याचे छताचे पत्रे खोलून त्याद्वारे आत प्रवेश करून सीसीटीव्ही कॅमेरे कशाच्या तरी सहाय्याने वर करून ऑफिसमधील लोखंडी कपाटातील तसेच टेबलच्या ड्रॉव्हरमध्ये असलेले रोख रक्कम असा मिळून जवळपास 1 लाख 26 हजाराची रोख रक्कम लंपास केल्याची घटना पनवेल जवळील दत्त मंदिराच्या पाठीमागे जुना मुंबई-पुणे हायवे, पळस्पे फाटा येथे घडली आहे.
राजेश शहा यांच्या जे.के.अॅण्ड सन्स, परमेश्वरी कॉर्पोरेशन कंपाऊंड पळस्पे फाटा या ठिकाणी असलेल्या गोडावूनमध्ये अज्ञात चोरट्याने छताचे पत्रे खोलून त्याद्वारे आत प्रवेश करून सीसीटीव्ही कॅमेरे कशाच्या तरी सहाय्याने वर करून ऑफिसमधील लोखंडी कपाटातील तसेच टेबलच्या ड्रॉव्हरमध्ये असलेले रोख रक्कम असा मिळून जवळपास 1 लाख 26 हजाराची रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.