| नवीन पनवेल | प्रतिनिधी ।
पनवेल शहरातील सिटी वाईन शॉपमध्ये प्रवेश करून चोरांनी 2 लाख 76 हजार 650 रुपयांची दारूच्या बाटल्या, रोख रक्कम आणि सीसीटीव्ही फुटेजचा डीव्हीआर संच चोरून नेला आहे. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि.9) पनवेल मधील ठाणा नाका येथील सिटी वाइन शॉपच्या शटरची कडी कोयांडा तोडून चोरांनी आतमध्ये प्रवेश केला आणि दारू आणि रोख रक्कम चोरून नेले.
दारूच्या बाटल्या, रोख रकमेची चोरी
