| महाड | प्रतिनिधी |
महाड तालुका हद्दीत दाट धुक्यामुळे सोमवारी पहाटेच्या सुमाराला दासगाव आणि वीर या दोन गाव हद्दीत तीन अपघात झाले. अपघातात एका कार मधील तीन प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत.

वीर गावाजवळ रविवारी मध्य रात्र आणि सोमवारी पहाटेच्या सुमारास महामार्गावर उठणारी धूळ आणि सकाळी पडणार्या थंडीच्या धुक्यमुळे समोरून येणार्या वाहनांचा अंदाज न आल्याने कंटेनर चालकाचा गाडीवरून ताबा सुटला आणि अपघात झाला. कंटेनरचा चालक विक्रम मिश्रा रा.उत्तर प्रदेश हा सुखरूप बाहेर पडला. याच दरम्यान सकाळी 3:30 वाजण्याच्या सुमारास याच हद्दीत काही अंतरावर मुंबई ते महाड येणारी बालेनो कार क्रमांक एम एच- 06-सी डी -7570 ही रस्त्याच्या डीवायडर वर धडकली या कार मध्ये तीन प्रवासी प्रवास करत होते एअर बॅग मुळे कारमधील प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही.
त्याच दरम्यान काही अंतरावर दासगाव गाव हद्दीत रत्नागिरी ते मुंबई जाणारी वेरणा कार क्रमांक एम एच 01-ए एच-2756 या कारणे रस्त्यालगत असलेल्या पोरीला जोराने धडक दिली. कार मधील चार प्रवासी जखमी झाले . या जखमींना उपचारा साठी महाड हद्दीतून दुसर्या ठिकाणी नेण्यात आल्या मुळे जखमींची नावे मिळू शकली नाही. दोन अपघातांची नोंद महाड तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आलेली आहे. एका अपघाताची नोंद झालेली नाही.