। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग-रेवदंडा मार्गावरील कुरुळनजिक गुरुवारी रात्री झाड कोसळले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
क्षत्रिय समाज मंगल कार्यालय परिसरात असलेले हे झाड अचानकपणे हे झाड कोसळले त्यामुळे दोन्ही बाजूकडे वाहनांच्या मोठ-मोठ्या रांगा लागल्या.
नारळी पौर्णिमेनिमित्त चाकरमानी मोठ्या प्रमाणात गावी आले होते. ते रात्री परतत असताना त्यांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. याबाबतचे वृत्त प्रशासनाला कळताच तातडीने आपत्ती निवारण कक्षाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीवर नियंत्रण करीत होते.