कारगिल विजय दिनानिमित्त वृक्षारोपण

| माणगाव | वार्ताहर |
माणगाव पोलीस ठाण्यातर्फे माणगाव पोलीस ठाणे हद्दीतील माजी सैनिक यांच्या हस्ते मंगळवार, दि.26 जुलै रोजी सकाळी 11.45 ते 12.15 दरम्यान कारगिल विजय दिनानिमित्त व्हिक्टोरिया क्रॉस विजेते वीर यशवंत घाडगे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील, माणगाव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, माजी सैनिक, पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version