| माणगाव | वार्ताहर |
माणगाव येथील छत्रपती करिअर अकॅडमी आर्मी व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राचा सहावा वर्धापन दिन शुक्रवार दि. 1 सप्टेंबर 2023 रोजी संस्था कार्यालय आशीर्वाद कॉम्प्लेक्स साई नगर, निजामपूर रोड, माणगाव याठिकाणी अकॅडमीचे मार्गदर्शक पोलीस निवास साबळे व अकॅडमीच्या संस्थापिका माधुरी निवास साबळे यांच्यहस्ते केक कापून व मान्यवर तसेच अकॅडमीचे शिक्षक व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला.
या अकॅडमीच्या 6 व्या वर्धापन दिनानिमित्त संस्था कार्यालय याठिकाणीसकाळी 10 वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा व त्यानंतर दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या अकॅडमीतून गेल्या 6 वर्षात 3 विद्यार्थी पोलीस उपनिरीक्षक, 60 विद्यार्थी पोलीस, 15 रेल्वे पोलीस, 70 विद्यार्थी आर्मी, 100 विद्यार्थी होम गार्ड, 25 विद्यार्थी महाराष्ट्र सुरक्षा दलामध्ये भरती झाले आहेत. पोलीस खात्यात या अकॅडमीतील विद्यार्थी रायगड पोलीस, मुंबई पोलीस, पुणे पोलीस, पालघर पोलीस म्हणून भरती झालेले आहेत. या अकॅडमीतील विद्यार्थ्यांना संस्कारक्षम शिक्षण देऊन घडविले जात असल्याने या अकॅडमीचे नाव सर्वदूर झाले आहे. शुक्रवारी अकॅडमीचा 6 वा वर्धापन दिन साजरा करताना विद्यार्थ्यांनी संस्था कार्यालयाची उत्तम प्रकारे सजावट केली होती. वर्धापन दिनानिमित्त संस्था चालक, शिक्षक वर्ग, विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावरील आनंद ओसांडून वाहत होता.