। पनवेल । प्रतिनिधी ।
कळंबोली वसाहतीत सुरु असलेल्या विकास कामादरम्यान शिव- पनवेल महामार्गावरील केएलई कॉलेज ते सेक्टर 12 येथील रोडपाली विसर्जन तलाव या दरम्यान असलेले 35 वृक्ष बाधित होत असल्याने बाधित होणार्या वेक्षांच्या बदल्यात 367 वृक्ष लागवड करण्याचे आदेश आयुक्त मंगेश चितळे यांनी पालिकेच्या उद्यान विभागाला दिले आहेत.
बाधित होणार्या वृक्षाची पूर्ण पणे तोड न करता रोडपाली सेक्टर 17 येथील उद्यानात बाधित वृक्षाचे पुनररोपण करण्यात येणार असल्याची माहिती वृक्षप्राधिकरण विभागाकडून देण्यात आली आहे. जवळपास 80 करोड रुपये खर्च करून पालिका हद्दीतील कळंबोली वसाहती मधील रस्ते काँक्रिटीकरण तसेच नाले विस्तारिकरणाचे काम सुरु आहे.