लक्ष्मण दळवी यांना पितृशोक

। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव येथील लोहित हार्डवेअरचे मालक तथा माणगाव व्यापारी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण दळवी यांचे पिताश्री सदाशिवराव महादेवराव दळवी यांचे बुधवारी (दि.22) पहाटे 4 वा. राहत्या घरी माणगाव येथे वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 90 वर्षांचे होते. त्यांच्या पश्‍चात दोन मुले, तीन सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने दळवी कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

Exit mobile version