| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
शेतकऱ्यांचे कैवारी, सावकारांविरोधात लढा देणारे आणि शेतकरी-कामगारांच्या हक्कासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे क्रांतियोद्धा स्व. नारायण नागू तथा नाना पाटील यांची शनिवारी (दि. 29) जयंती जिल्हाभर विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. यानिमित्ताने जिल्ह्यातील विविध ठिकाणी त्यांच्या प्रतिमेस व पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
अलिबाग येथील शेतकरी भवनात शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने स्व. नाना पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी शेकापचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पनवेल, खालापूर, कर्जत, उरण, पेण, अलिबाग, मुरुड, रोहा, सुधागड, माणगाव, तळा, म्हसळा, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर यांसह जिल्ह्यातील विविध ठिकाणी नाना पाटील यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. पेझारी, पोयनाड तसेच खारेपाट विभागातही नाना पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली. जिल्ह्यातील पीएनपीच्या सर्व संस्थांच्या वतीनेही स्व. नाना पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली. शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य जनतेच्या हक्कांसाठी त्यांनी केलेल्या संघर्षाचे यावेळी स्मरण करण्यात आले.







