। रसायनी । वार्ताहर ।
मोरबे पुनर्वसन नानीवली गावा शेजारी ग्रुपग्रामपंचायत चौक यांचे डम्पिंग ग्राउंड आहे. शुक्रवारी (दि.20) सायंकाळी रिक्षा चालक दिनेश पाटील व सचिन कातकरी हे पनवेल तालुक्यातील असून यांनी मिळून नानिवली ठाकूर वाडीतील एका गरीब शेतकर्याचे लहान वासरू बळजबरीने रिक्षात अमानुष पद्धतीने कोंडून चोरून नेले. ही माहिती मिळताच स्थानिकांनी रिक्षाचा पाठलाग केला असता, आरोपी यांनी चोरलेले वासरू लोधीवली येथील रिलायन्स कॉलनी येथे सोडून पलायन केले. वासरूची किंमत अंदाजे 7 हजार रुपये असून दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. याबाबत खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.