। पनवेल । वार्ताहर ।
पाण्याच्या डबक्यात पडून 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना करंजाडे वसाहतीमध्ये घडली आहे. करंजाडे वसाहतीमधील सेक्टर 4 साईबाबा मंदिर परिसर स्मशानभूमीजवळ एका पाण्याच्या डबक्यात सोहेल रमजान अन्सारी (12) हा पोहण्यासाठी गेला. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. या घटनेची नोंद अकस्मित मृत्यू म्हणून पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
12 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू
